Home क्राईम पैठण कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला अटक; पहूर पोलीसांची कारवाई

पैठण कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला अटक; पहूर पोलीसांची कारवाई

0
139


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या देवाण-घे वाणीच्या कारणावरून त्याचा शालकाचा खून केल्याप्रकरणी हिवरखेडा येथील एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. त्यानुसार पैठण कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना ३० मे रोजी पळून गेला होता. त्याला पहूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी १२ वाजता हिवरखेडा येथील राहत्या घरून अटक केली आहे.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा या गावांमध्ये २०१० साली सुलतान भिकन तडवी (वय ५३, रा. हिवरखेडा) याने पैशांच्या देवाण-घे वाणीच्या कारणावरून त्याचा शालकाचा खून केला होता. त्यानुसार पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा मिळाल्यानंतर तो संभाजीनगर जिल्ह्यात पैठण कारागृहात शिक्षा भोगत होता.

दरम्यान ३० मे रोजी तो पैठण कारागृहातून पळून गेला होता. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली होती. पहुर पोलिसांनी माहिती काढून तो घरी असल्याचे समजताच त्याच्या घरी जावून शुक्रवारी ७ जून रोजी दुपारी १२ वाजता अटक केली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांनी केली.


Protected Content

Play sound