वाल्मिकी मेहतर समाजाचा भुसावळ प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जूना सातारा रोडवर २९ मे रोजी रात्री ९.३० वाजता माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवार ७ जून रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ येथील समस्त वाल्मिकी मेहतर समाज बांधवांनी भुसावळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. गुन्हेगारांवर जलद न्यायालयात खटला चालवून दोषींना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरात २९ मे रोजी रात्री ९.३० वाजता जुन्या वादातून माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्यावर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर मात्र अद्याप फरार आहे. या घटनेच्या निषेधार्थ भुसावळ येथील समस्त वाल्मिकी मेहतर समाज बांधवांच्या वतीने शुक्रवार ७ जून रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना योग्य व कडक शासना होण्यासाठी हा खटला जलद न्यायालयात चालविण्यात यावा. अटकेतील गोलू पंडीत हा वार्डात दहशत निर्माण करत आहे, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तर दुसरा संशयित जॅकी पथरोड याने त्यांच्या घरासमोर आलेल्या रोडवर अतिक्रमण केलेले आहे. ती जागा मोकळी करण्यात यावी. या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, सात दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास समाज बांधव हे १५ जून रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. अशा इशारा दिला आहे.

Protected Content