गावठी पिस्तुलासह घरफोडी मधील फरार आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी । घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना अटक करतांना आरोपींकडे असणार्‍या गावठी पिस्तुलातून फायर झाले असून यात सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.

याबाबत वृत्त असे की, बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन ५८८/२०२० भा द वि कलम- ४५४, ४५७,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी अलतमश रशीद शेख (वय-२१ रा.जाम मोहल्ला भुसावळ) व जहीर सलीमोद्दीन सय्यद (वय-१९ रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ) हे शहरात आल्याची माहिती सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांना मिळाली होती. यानुसार पोलीस पथकाने जाम मोहल्ला भागातून सापळा रचून दोन्ही जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रसंगी आरोपी अलतमश शेख याची अंगझडती घेत असताना तो झटपटी करू लागला. त्याच दरम्यान त्याच्या कमरेतून एक गावठी कट्टा बनावटीच्या पिस्टल खाली पडून एक राऊंड जामीनीच्या दिशेने फायर झाले. यात सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. तसेच त्यातून दोन जिवंत कारतुस व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आले असून आरोपी जहीर सलीमोद्दीन सय्यद याच्या कडून एक चाकू हस्तगत करण्यात आली असून त्याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो स्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम-३/२५,३/२७ प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

संबंधीत कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पोना किशोर महाजन, समाधान पाटील, रमण सुरळकर,रविंद्र बिर्‍हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देखमुख, इश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली आहे.

Protected Content