Home क्राईम विषारी औषध घेतलेल्या शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय…

विषारी औषध घेतलेल्या शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय…

0
101


भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील महिंदळे गावातील एका ८७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार ५ जून रोजी घडली आहे. दरम्यान जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

गुलाब लालसिंग भिल (वय ८७, रा. महिंदळे ता. भडगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. महिंदळे गावात ते परिवारासह राहत होते. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी ५ जून रोजी ते शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. त्यावेळेला दुपारी १२ वाजेच्या सुमारास गुलाब भिल यांनी कुठले तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच गुलाब भिल यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान उपचार सुरू असताना बुधवारीच रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound