भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील आदर्श शेतकरी राजेंद्र साहेबराव पाटील यांना नुकताच महाराष्ट्र केळी उत्पादक संघाच्या वतीने केळीरत्न पुरस्काराने कंदार ता.करमाळा जि. सोलापूर येथे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण साहेब यांच्या हस्ते केळी रत्न पुस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित जळगाव जिल्हा केळी संघाचे उपाध्यक्ष उत्तम रामभाऊ पाटील व संभाजीनगरचे जिल्हा केळी संघाचे अध्यक्ष धीरज पाटील, आमचे मित्र कोर्ट क्लार्क दीपक पाटील, युवा शेतकरी भूषण भाऊ येवले, दीपक महाजन मा.उपसरपंच, आदर्श शेतकरी भावडू महाजन यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.