माजी नगरसेवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला; हाताची बोटे कापली

मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मालेगाव येथे गुन्हेगारीने डोकेवर काढले आहे. शहरातील एका नगरसेवकासह त्याच्या मुलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री ही घटना मालेगावच्या हजार खोली परिसरातील मदिना चौकात घडली असून यात माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेत अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताची बोटे कापली गेली आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजीज लल्लू व त्यांच्या मुलगा हे नमाज पठण करून शनिवारी रात्री घरी जात होते. यावेळी ते हजारखोली भागातील मदिना चौक येथे आले असता दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्ले खोरांनी या दोघांवर तलवारीने वार केले. अजिज लल्लू यांच्या डोक्यावर हातावर तलवारीने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताची बोटे देखील कापली गेली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने जवळील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ही गंभीर आहे. हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मदिना चौकात मोटारसायकलवरुन आलेल्या दोन ते चार जणांनी अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर हल्ला केला. अझीझ लल्लू यांचा त्यांच्या नातेवाईकांशी जमिनीवरुन वाद सुरु आहे. यातूनच हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Protected Content