इगतपुरीचे आ. खोसकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा उल्लेख करून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेले असतानाच आमदार हिरामण खोसकर हे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फार्म येथे दाखल झाले आहेत. हिरामण खोसकर हे महायुतीत येणार अशा चर्चा मागील काळापासून रंगल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषणादरम्यान अजित पवारांनी खोसकरांचे नाव घेतले होते. आता हिरामण खोसकर आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तुम्ही महायुतीत जाणार का? अशी विचारणा हिरामण खोसकर यांना केली असता त्यांनी या प्रश्नावर मिश्किल टिप्पणी केली आहे. 20 पैकी 19 जण महायुतीत आहेत. पण मी एकटाच महाविकास आघाडीत आहे, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ हे मंत्री असल्याने त्यांनी भेट घेतल्याची प्रतिक्रिया हिरामण खोसकर यांनी दिली आहे. आता ते खरंच महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Protected Content