शेतातील घर खाली करण्यावरून दाम्पत्याला मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील दडपिंप्री गावात शेतातील घर खाली करण्याच्या कारणावरून दांपत्याला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना २४ मे रोजी सकाळी १० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ४.३० वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात ७ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

समाधान शंकर राठोड वय -४० रा. दडपिंप्री ता. चाळीसगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २४ मे रोजी सकाळी १० वाजता तो घरी बसलेला असताना गावात राहणारे निलेश छगन राठोड, बळीराम पदम राठोड, गोपाल पदम राठोड, मेघराज भगा राठोड, सतीश पदम राठोड, छगन भगा राठोड आणि बयाबाई पदम राठोड या सात जणांनी शेतातील घर खाली करण्याच्या कारणावरून लाकडी दांडा डोक्यात मारून दुखापत केली. तसेच त्याच्या पत्नीला देखील मारहाण करत दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी २८ मे रोजी दुपारी ४.३० वाजता समाधान राठोड यांनी मेहूणबारे पोलिसात फिर्यादी दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मिलिंद शिंदे करीत आहे.

Protected Content