Home राजकीय १० जूनला दोन्ही राष्ट्रवादीचे गट पक्षाचा २५वा वर्धापनदिन साजरा करणार

१० जूनला दोन्ही राष्ट्रवादीचे गट पक्षाचा २५वा वर्धापनदिन साजरा करणार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदा २५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु यंदाचे वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळे असणार आहे. कारण या पक्षात आता दोन गट निर्माण झाले आहेत. फुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापनदिन आहे. त्यातही अजित पवार यांनी नुकतंच वर्धापनदिन सोहळा धडाक्यात साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाचा १० जून रोजी होणारा वर्धापनदिन सोहळा जोरदार साजरा करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. लवकरच हा सोहळा दिल्ली आणि मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे साजरा केला जाणार याबाबत देखील घोषणा होणार आहे.

एकीकडे अजित पवार गटाने जोरदार तयारी केली असली तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट देखील वर्धापन दिन साजरा करणार असल्याची सूत्रांनी माहिती आहे. पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. शिवाय सध्या पक्ष आणि चिन्ह दोन्ही न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळे आम्ही देखील वर्धापन दिन 10 जूनला साजरा करु असा दावा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे. एकंदरीतच सध्या जरी दोन्ही गटाने वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी याप्रकरणी दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.


Protected Content

Play sound