जळगाव (प्रतिनिधी) सत्ताधारी भाजप व विरोधक शिवसेना हे महापालिकेचे बॅंक खाते सिल होण्यास जबाबदार असून ही लाजीरवाणीबाब आहे, मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र देवून सुध्दा त्याचा पाठपुरावा करण्यास आमदार अपयशी ठरले आहेत. या नैतिक्तेवर त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत शहर कॉंग्रेसचे महानगरध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केली.
महापालिकेचे हुडको कर्ज प्रकरणी डीआरटीच्या नोटीसवरून बॅंक खाते सिल प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बुथ कमीटीचे नदीम काझी उपस्थित होते.पुढे बोलतांना डॉ. चौधरी म्हणाले की, दुसऱ्यांदा महापालिकेचे बॅंक खाते सिल झाले असून यात पाच लाख जळगावकाराचे नुकसान कधी न भरणारे आहे. दरम्यान, २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री व्यकंया नायडू यांना वन टाईम सेटमेंटसाठी पत्र दिले होते. भाजपची केंद्र व राज्यात देखील सत्ता असून एक वर्षात आमदारांनी त्याचा योग्य पाठपुरावा न केल्याने ही नामुष्की आज ओढावली असल्याचा आरोप डॉ. चौधरी यांनी केला.हुडकोसाठी भाजपने महापालिकेत सत्तेत आल्यापासून काय प्रयत्न केले ते जनतेला दाखवावे असे आवाहन केले. हुडको, गाळे प्रकरण, समांतर रस्ते, अतिक्रमण समस्या सोडविण्याचे घोषणा जाहिरनाम्यात दिल्या असतांना यापैकी एक ही आमदार पूर्ण करू शकलेले नाही. केवळ महापालिकेत बेकादेशीर गोष्टींना पाठबळ देण्याकडे त्यांचा कल असतो असा थेट आरोप डॉ. चौधरी यांनी केला.