Home Cities चोपडा धानोऱ्यात पावसाने लावली हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

धानोऱ्यात पावसाने लावली हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा

0
123


paus

धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

धानोरा परीसरात पावसाने जणू पाठ फिरविली होती. गुरूवार 27 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्य सुमारास पावसाचे आगमन होताच शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोकसहभागातून नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. अजून दोन पावसानंतर खोलीकरणाचा भाग पुर्ण पाण्याने भरणार आहे. आता शेतकरी वर्ग पेरणी करण्यासाठी मोकळा झाला आहे. शेतमजूरांना रोजंदारी देखील उपलब्ध झाली आहे.


Protected Content

Play sound