Home Cities एरंडोल रा.ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्याचा सत्कार

रा.ती. काबरे विद्यालयात माजी विद्यार्थ्याचा सत्कार

0
101
erondol maji vi
erondol maji vi

erondol maji vi

एरंडोल प्रतिनिधी । येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाचा माजी विद्यार्थी पियुष परदेशी यांचा दि. 26 जून रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका आर.एस. मानुधने यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पियुष परदेशी हे मुंबई येथील मलबार हील पोलिस स्टेशनला कार्यरत आहे. परदेशी यांना समाजसेवेची प्रचंड आवड असून, ते नेहमी समाजसेवेसाठी तत्पर असतात. काही दिवसांपूर्वीच दादर स्टेशनवर एका वयोवृद्धाचे प्राण वाचवले होते. तसेच त्यांनी गेल्या वर्षी काबरे विद्यालयाने काढलेल्या शैक्षणिक सहलीत देखील मुंबई येथे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सहकार्य केले होते. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आर.एस. मानूधने, पर्यवेक्षक ए.आर. मालू, एन.एन.डागा व सर्व विद्यार्थी व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.एस. नेटके यांनी केले.


Protected Content

Play sound