Home क्राईम भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी लांबविली

भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी लांबविली


चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील घाट रोड परिसरातून भाजीपाला विक्रेत्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे १७ मे रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी सोमवारी २० मे रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, संतोष फकीरा महाजन वय ४८ रा.हिरापूर रोड, चाळीसगाव हे कुटुंबासह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ एएस १७८२) ने घाट रोड परिसरात आलेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २० मे रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ पंकज पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound