Home क्राईम नात्याला काळीमा फासणारी घटना; सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना; सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

0
199

परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परभणी जिल्हयात सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जिल्हयात जिंतूर तालूक्यात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असून तो काहीच काम धंदा करत नाही. दिवसरात्र नशेत असतो. म्हणून सासऱ्याने पीडितेला पिठाची गिरणी टाकून दिली होती. त्या माध्यमातून पैसे कमवून ती घर चालवत होती. यावरुन सासऱ्याने तिला सुनावले होते. केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कुणी नसताना पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर अत्याचार केला. मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तु माझ्या पत्नीसारखीच आहेस. याबबात कोणाला सांगू नकोस,असे म्हणत पीडित महिलेला धमकावले. सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप घाबरली होती. मात्र वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून हिंमत करत तिने जिंतूर पोलीस स्थानक गाठून सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरातून संताप व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound