Home राज्य सप्तश्रृंगी गडावर टॅम्पोला आग; सुदैवाने जीवीतहानी टळली

सप्तश्रृंगी गडावर टॅम्पोला आग; सुदैवाने जीवीतहानी टळली

0
86


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिर्डीहून नाशिक येथील सप्तश्रुंगी गडावर जाताना एका टॅम्पोला सप्तश्रृंगी घाटात आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागली तेव्हा टेम्पोमध्ये १९ प्रवासी होते. आगा लागताच टेम्पोतील सर्व भाविक तातडीने खाली उतरले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. सर्वच प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्या मुळे मोठी दुर्घटना टळली.

सप्तश्रुंगी गडावर भावीत जात होते. टेम्पोने हे सर्व भाविक जात होते. त्यात ९ महिला, ९ पुरूष आणि चालक या टेम्पोमध्ये होता. ही गाडी घाटातून वर चढत होती. त्यावेळी ही आग लागली. आग लागल्याचे चालकाला समजताच त्याने गाडी जागेवरच थांबवली. त्यानंतर सर्व भावीक तातडीने खाली उतरले. आगीने बघता बघता सर्व गाडीला आग लागली. आग वाढत जात होती. त्याच वेळी तिथे असलेले स्थानिक ग्रामस्थ आणि रोप वे चे कर्मचारी मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रवाशांना बाजूला केले. गाडीला लागलेली आग विझवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. ही गाडी शिर्डीवरून वणीकडे जात होती.


Protected Content

Play sound