जळगाव ते भादली रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धक्क्याने वृध्द ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावात राहणारे ७० वर्षीय वृध्दाचा जळगाव ते भादली रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेने धक्का दिल्याने मृत्यू झाल्याचे शनिवारी १९ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भास्कर रामा मिस्तरी वय ७० रा. आसोदा ता. जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आसोदा येथे भास्कर मिस्तरी हे वृध्द आपल्या कुटुंबासह वास्तव्याला होते. शनिवारी १९ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली रेल्वे रूळावरील खंबा क्रमांक ४२४च्या १४ आणि १६ च्या दरम्यान डाऊन लाईन ओलांडत असतांना एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीसांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जळगाव तालुका पोलीसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव उपस्टेशन प्रबंधक यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माणिक सपकाळे हे करीत आहे.

Protected Content