भिंवडीमध्ये लाखो तर कल्याणमध्ये ८० हजार नागरिकांची नावे मतदारयादीतून अचानक गायब

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान सुरू आहे. अशातच मतदार याद्यांमध्ये मोठा घोळा निर्माण झाला आहे. भिवंडी मतदारसंघातील कल्याण पश्चिममध्ये हजारो नागरिकांची नावे मतदार यादीतून अचानक गायब झाली आहे. कल्याणमधील नागरिक मोठया उत्साहाने मतदान केंद्रात वोंटग कार्ड घेऊन गेले पण मतदार यादीमध्ये नाव तपासले असता त्यांचे नावच यादीमध्ये नव्हते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कल्याण लोकसभेमध्ये ८० हजारांहून जास्त तर भिवंडी लोकसभेसाठी एक लाखांहून जास्त मतदारांची नावे गायब झाले आहे. मतदार यादीमधून लाखो नागरिकांची नावे वगळली गेली असल्याने कल्याण लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. तर भिवंडीमध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांची मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो. मतदारयादीमधून नावे वगळण्यात असल्याने अनेकांनी निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे यावर बोलता येत नसल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.

Protected Content