निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा करतो आहे; उद्धव ठाकरे यांचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. अशातच मुंबईतील मतदान केंद्रावर सकाळपासून सावळा गोंधळ उडाल्याने नागरिक संतापलेले पाहायला मिळाले. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. .

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग हा भाजपची चाकरी करत असून ज्या ठिकाणी आम्हाला चांगली लीड मिळू शकते, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक मतदारांना त्रास दिला जात असल्याचा घटना समोर आल्या आहेत. परंतु माझे मतदारांना आवाहन राहील की, नागरिकांनी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात जावं, त्यानंतर रात्री किती वाजू द्या, तुमचा मतदानाचा हक्क बजवावा, तोपर्यंत केंद्रातील अधिकाऱ्यांना सोडू नका, तुमचा मतदानाचा हक्क बजवावा. महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज तासाभरात संपतो आहे. मतदान आयोगाकडून आवाहन केले जाते. परंतु निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचे दिसत आहेत. मतदान आयोगाच्या तथाकथीत प्रतिनिधी दिरंगाई करत आहेत. ज्येष्ठ मतदार आहेत यांना मोठा त्रास झालेला आहे. कुठलिही सुविधा करण्यात आलेली नाही. रांगा लावून उभे असलेले मतदारांना विनाकारण त्रास देण्याचे काम केले जात आहे.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, जी कुठलिही केंद्र आहे, ज्या ठिकाणी दिरंगाई केली जात असेल तर त्याची नोंद करा, तर पोलिंग ऑफिसरचे नाव लिहून घ्या, जेणेकरून त्यांच्याविरोधात आपल्या सर्वांना न्यायालयात दाद मागता येईल. भाजपच्या व निवडणूक आयोगाच्या या डावाला मतदारांनी बळी पडू नये. पराभवाच्या भितीने भाजप पछाडलेले आहे. ‘मतदान करा, मतदान करा’ असे निवडणूक आयोग सांगते. मग लोक उतरले तर निरुत्साही तेथील यंत्रणा पाहून लोक कंटाळून बाहेर पडत आहेत. निवडणूक आयोग काय बसल्याजागी राजयोग पणा दाखवत आहे का ? विलंब लागत आहे, त्याला क्षमा करता येत नाही. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. जिकडे शिवसेनेला मत पडत आहेत, त्या ठिकाणी जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.

Protected Content