नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तारक मेहता का उल्टा चश्मा फेम रोशन सिंग सोढी म्हणजेच अभिनेता गुरूचरण सिंग सोढी गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर अभिनेता १७ मे रोजी घरी परतला आहे. पण २५ दिवसांनंतर अभिनेता पुन्हा घरी परतल्यामुळे कुटुंबिय आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. गुरूचरण सिंग वडिलांचा वाढदिवस सारजा केल्यानंतर 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता. पण 26 तारखेपर्यंत अभिनेता मुंबईत पोहोचलाच नाही. अभिनेत्याचा मोबाईल देखील बंद होता. अशात गुरुचरण याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण आता अभिनेता घरी आल्यामुळे सर्व चर्चांनी पूर्णविराम लागला आहे.
घरी परतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली आणि स्थानिक न्यायालयात अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अभिनेता म्हणाला, दुनियादारी सोडून धार्मिक प्रवासासाठी गेलो होतो. कधी अमृतसर तर कधी लुधियानातील गुरुद्वारामध्ये राहत होतो. अखेर कळेल की आता घरी जायला हवे म्हणून पुन्हा घरी आलो. अभिनेत्याच्या वडिलांनी देखील मुलगा घरी आल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. त्याची प्रकृती ठीक आहे. गुरुचरणचं कोणी अपहरण केलं नव्हते. तो घरी परत आला आहे. आम्ही पोलिसांना सर्वकाही सांगितले आहे. अभिनेत्याची कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे गुरुचरण याच्या वडिलांना तक्रार दाखल केली होती.