अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला शहरातील ख्यातनाम व्यापरी अरूणकुमार वोरा यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. अरुणकुमार वोरा यांच्या शोध घेत पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून करून अपहरण करणाऱ्या पाचा व्यक्तीना अटक केली आहे. यामध्ये मिथुन इंगळे हा मुख्य संशयित आरोपी आहे. या प्रकरणातील इतर दोघे जण फरार असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. अरूणकुमार वोरा यांचा १३ मे रोजी रात्री अपहरण झाले होते. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूणकुमार वोरा यांचे अपहरण करून अपहरण करणाऱ्यांनी त्यांना सोडण्यासाठी १ कोटीची मागणी केली होती. त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार, दोन बनावट देशी कट्टे आणि चार मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहे. किशोर दाभाडे, फिरोज खान युसूफ खान, शरद पुंजाजी दाभाडे, अशिष अरविंद घनबाहादुर, राजा सरफराज खान, चंदु इंगळे या सात लोकांनी व्यासायिक वोरा यांचे अपहरण केल्याच समोर आले.
प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचं नुकतेच अपहरण झाले होते. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या चारजिन कपाउंड परिसरात ही अपहरणाची घटना १३ मे च्या रात्री पावणे 10 वाजताच्या सुमारास घडली होती. त्यानंतर त्यातील २ ते ३ जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले. यादरम्यान त्यांनी ‘बचाव-बचाव’ म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र, तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगाने पळवलं. या घटनेनंतर अकोला शहरासह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अकोला पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करत पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान केले. अखेर अरुणकुमार वोरा यांच्या शोध घेत पोलिसांनी अपहरणकर्त्यांकडून त्यांची सुखरूप सुटका केली आहे. तसेच या प्रकरणातील व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.