पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जागतिक डेंग्यू दिनानिमित्त आज १६ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोदतर्फे गावामध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तुषार देशमुख ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप कुमावत, डॉ.थोरात, हिवताप पर्यवेक्षक प्रविण दाभाडे यांच्या मार्गदर्शन खाली डेंगू मलेरिया विषयक हस्तपत्रिका, भित्तिपत्रक, आरोग्याचे संदेश भिंतीवर लिहिण्यात आले. तसेच ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती केली.
सार्वजनिक ठिकाणी डेंगू विषयी माहिती पत्रके वाटण्यात आली .कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मार्गदर्शन करतांना डेंग्यू हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. सहसा हा डास व्हायरस असलेल्या एखाद्या व्यक्तीस चावतात, जे डास चावण्याद्वारे इतर लोकांमध्ये हस्तांतरित होऊ शकतात. डेंग्यूची काही लक्षणे म्हणजे तीव्र ताप, डोकेदुखी, पुरळ आणि स्नायू आणि सांधेदुखी. गंभीर प्रकरणांमध्ये, गंभीर रक्तस्त्राव आणि शॉक असू शकतो. या टप्यावर डेंग्यू जीवघेणा असू शकतो. मात्र योग्य वेळी योग्य उपचार करून डेंग्यूला आळा घालता येऊ शकतो. जगातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये याचा प्रादुर्भाव आहे. दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंध दिन साजरा केला जातो. या आजाराविषयी जनजागृती केली जाते. आपण त्याचा सामना कसा करू शकतो या विषयी जनजागृती केली जाते.
डेंग्यूच्या साथीचे हंगामी स्वरूप असते, पावसाळ्यात आणि नंतर संसर्ग बऱ्याचदा शिगेला पोचतो. पहूरला जनजागृती करण्यात आली .यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. थोरात सर , आरोग्य निरीक्षक उमेश मस्के, आरोग्य सेवक राजेंद्र वाणी, राजु मोरे, राजेंद्र भिवसने, आरोग्य सेवक आर .बी पाटील, रोहित श्रीखंडे, गटप्रवर्तक माधुरी पाटील, यमुना चौधरी सर्व आशा सेविका, ग्रामस्थ आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक डेंग्यू दिनानिमित्त पहूर येथे डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती
7 months ago
No Comments