नगरदेवळा येथे कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ

पाचोरा प्रतिनिधी । देशभरात दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील विविध व्याधींनी त्रस्त असलेले नागरिक या टप्प्यात सरकारी केंद्रांवर मोफत लस टोचून घेऊ शकणार आहेत. यासाठी पात्र नागरिकांना को – विन अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

८ मार्च रोजी या कोरोना लसीकरण ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ नगरदेवळा ता. पाचोरा येथे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य वसंत गायकवाड, सरपंच प्रतीक्षा काटकर, वैद्यकीय अधिकारी योगेश बसेर व आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड लस मिळविण्यासाठी तुम्हाला फोटो आय.डी. पुराव्यासह ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑन दि स्पॉट कोणतीही नोंदणी होणार नाही. लस कुठल्या केंद्रावर टोचून घ्यायची, याचे केंद्रही आपण स्वत:च निवडू शकणार आहेत. लसीचे दोन्ही डोस केव्हा दिले जातील याचा एस. एम. एस. पाठविला जाईल. २८ दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन नगरदेवळा वैधकीय अधिकारी डॉ. विरेंद्र पाटील, योगेश बसेर यांनी केले आहे.

Protected Content