मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयुर्वेदा, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी अर्थात आयुष अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमांसाठी अनिवार्य असलेली आयुष-पीजी प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी ३१ जुलै पर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेले विद्यार्थीच पात्र ठरणार आहेत. आयुष पीजीसाठी विविध भाषांतून परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.
त्यानुसार आयुर्वेदाचा पेपर हा इंग्रजी आणि हिंदीतून होईल. होमिओपॅथी केवळ इंग्रजी, सिद्ध इंग्रजीतून आणि तामिळ व युनानीचा पेपर इंग्रजी आणि उर्दूत देण्याची संधी दिली आहे. पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत परीक्षा देण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथीची प्रवेश पूर्वपरीक्षा हिंदी भाषेतूनही देता येणार
7 months ago
No Comments