पत्नीला सासरी पाठवत नसल्याचा रागावरून भाऊजीने केला मेहुण्याचा खून

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्नीला सासरी नांदायला पाठवत ‎‎नसल्याने, भाऊजीने डोक्यात ‎‎दांडा मारुन ‎‎‎मेहुण्याचा‎‎‎ खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील करीमनगर येथे घडली आहे. ही घटना १३ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की संशयित त हसनुद्दीन मोईद्दीन‎शेख हा त्याचा मेहुणा हुसेन‎ हारून शेख शहरातील करीमनगरात शेजारी राहतात. संशयिताचे त्याच्या पत्नीसोबत नेहमी भांडत होत असे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यापासून संशयिताचे पत्नी आपल्या मुलांना माहेरी आईवडिलांकडे गेली होती. संशयिताच्या मुलाच्या‎ हाताचे हाड मोडल्याने तो ‎आपल्या आईसह मुलाना ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎भेटण्यासाठी पत्नीच्या घरी सोमवारी गेला होता. त्याचवेळी दोन्ही कुटुंबात जोरदार‎ भांडण झाले. शेजारच्या ‎नागरिकांनी भांडण सोडवले.‎ त्यानंतर संशयित शेख घरी गेला ‎व पुन्हा दांडा घेऊन सासरी‎ आला. रागाच्या भरात हसनुद्दीन याने त्याचा मेहुणा ‎हुसेन हारून शेख याच्या डोक्यावर दांड्याने वार केला.‎ नातेवाइकांनी कन्नड‎ ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर हसनुद्दीन फरार झाला होता. ‎मात्र कन्नड शहर ‎पोलिसांनी १२ तासांत त्याला अटक केली.‎

Protected Content