जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत होती. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळेही नागरिकांचा मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे.आज १४ मे रोजी प्रशासने मतदानाची फायनल आकडेवारी जाहीर केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात 57.7% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात 63.1% मतदान झाले आहे.