भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक आवारात बसमध्ये सीटीवर बसण्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी १२ मे रोजी रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता ४ जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील राहणारी महिला आपल्या नातेवाईकांकडे भुसावळ शहरात आलेल्या होत्या. त्यावेळी रविवारी १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता त्या बसस्थानकात बसमध्ये बसल्या. बसमधील सीटवर बसण्याच्या कारणावरून हारून शहा शब्बीर शहा, आरिफ शहा शब्बीर शहा, मेमुनाबी शहा, शमीनाबी शहा सर्व रा. गोजरी ता. भुसावळ यांनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग करून ढकलून दिले. दरम्यान या महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ठाण्यात धाव घेवून घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता मारहाण करणारे हारून शहा शब्बीर शहा, आरिफ शहा शब्बीर शहा, मेमुनाबी शहा, शमीनाबी शहा सर्व रा. गोजरी ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहे.




