बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीडमध्ये कौटुंबिक वादामुळे धक्कादायक घटना उगडकीस आली. पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: दोरीने गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना बीड शहरामध्ये घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा वायभट व भागवत वायभट अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. भागवत हा रिक्षाचालक असून बीड शहरात भाडयाच्या घरात कुटूंबासह रहात होता. शनिवारी रात्री तो घरी आला, त्यावेळी पत्नी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी त्याने पत्नीला मारहाणही केली. त्यानंतर मध्यरात्रीच डोक्याखाली घेण्याच्या उशिने पत्नीचे तोंड दाबले. त्यामध्ये गुदमरुन राधाचा मृत्यू झाला. पत्नीचा खून केल्यानंतर स्वत: देखील दरवाजाबाहेर असलेल्या हुकाला दोरी अडकवून भागवतने गळफास घेतला. शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सकाळी झोपेतून उठवल्यावर त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीने हा प्रकार पाहिला. आई आणि वडिलांच्या भांडणाचा झालेला शेवट पाहून, चिमुकलीने रडायला सुरूवात केली. त्यामुळे खालच्या मजल्यावरील लोक वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी, शेजारच्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शहरातील शिवाजीनगर पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेले होते. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
पतीने पत्नीची उशीने तोंड दाबून केली हत्या; नंतर स्वत:चेही संपवले जीवन
7 months ago
No Comments