जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
त्यात ०१ पोलीस अधीक्षक, ०२ अप्पर पोलीस अधीक्षक,०९ पोलीस उपधीक्षक,३१ पोलीस निरीक्षक, ११९ सहाय्य्क /उपनिरीक्षक, जिल्ह्यातील अंमलदार २५५०, बाहेरील जिल्ह्यातील अंमलदार २३६०, बीएसएफ ०१ कंपनी, ०२ एसआरपीएफ प्लाटून, ०२ सीआरपीएफ प्लाटून, ३०८५ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्या शिवाय बाहेरील राज्यातील तीन पोलीस कंपनी देखील जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. यात केरळ येथील २ कंपनी तर कर्नाटक येथील १ कंपनी दाखल झाली आहे.
मतदान केंद्रावर मोठा पोलिस बंदोबस्त असणार
7 months ago
No Comments