शिरूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे प्रसिध्द अभिनेते आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. त्यांची ही भूमिका प्रसिध्द झाली होती. राजकारणात आल्यानंतर त्यांना त्यांच्या अभिनयाच्याबाबतीत टीकेला सामोरे जावे. एका अभिनेत्याला लोकसभा मतदारसघाचे किंवा जनतेचे प्रश्न काय समजणार असे म्हणत राजकारणी त्यांची टीका करता. विशेषत: महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे त्यांची सध्या टीका करत आहे. मात्र, आता अमोल कोल्हेंनी या सर्व टीकाकारांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला आहे. खासदार कोल्हे यांनी पुढील पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचे क्षेत्र आहे. माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर, मी मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. मी जे पाहिलेले आहे, मला वाटतं अभिनय क्षेत्राला ब्रेक जरी घेतला तरी आत्ता शिरुर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणे यालाच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे, अभिनय क्षेत्रासाठी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काहीच हरकत नाही. काही दिवसांसाठी नाही, तर पाच वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेईल. माझी शिरुरच्या जनतेसाठी ही कमिटमेंट आहे असे अमोल कोल्हे म्हणाले. पुणे जिल्हयातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गट असा सामना रंगला आहे. शिरूरमध्ये अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा सामना शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होणार आहे. शिरूरमध्ये १३ मेला लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.