मैत्रेय समूहाच्या चौकशीला गती देण्याचे आदेश

meeting about maitreya group

मुंबई प्रतिनिधी । मैत्रेय समूहाने फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा व या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आढावा घेऊन या प्रकरणाच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यमंत्री ना. केसरकर म्हणाले की, मैत्रेय ग्रुपच्या माध्यमातून राज्यातील गुंतवणूकदारांची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने एकत्र करावी. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्था) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित कंपनीची मालमत्ता जप्तीसाठी राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. या प्रकरणाच्या तपासाला गती द्यावी. गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी गृह विभागाने पत्रक प्रसिद्ध करावे, असे निर्देशही यावेळी श्री. केसरकर यांनी दिले.

या बैठकीला ना. दीपक केसरकर ना. जयदत्त क्षीरसागर, आमदार किशोर पाटील, आमदार अनिल बाबर, तरूणकुमार खत्री, तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्यासह मैत्रेय समूहाचे एजंट आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

Protected Content