हरियाणामध्ये भाजपला धक्का; अपक्ष आमदारांनी काँग्रेसला दिले समर्थन

रोहतक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना हरियाणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हरियाणामधील सरकार अल्पमतात आले. हरियाणामध्ये नायबसिंग सैनी हे मुख्यमंत्री आहे. हरियाणातील भाजप सरकारला अपक्ष आमदारांनी झटका दिला आहे. अपक्ष आमदार सोंबीर सांगवान, रणधीर गोलन आणि धरमपाल गोंदर यांनी सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. रोहतकमध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुडा आणि उदय भान यांच्या उपस्थितीत अपक्ष आमदारांनी ही घोषणा केली.

हरियाणा विधानसभेचे सध्याचे संख्याबळ ८८ आहे. भाजपकडे ४० आमदार आहेत. याआधी भाजप सरकारला जेजेपी आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता, मात्र आता जेजेपी आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने सैनी सरकारने बहुमत गमावले आहे. त्यामुळे हरियाणामधील भाजप सरकार अल्पमतात आले आहे. असे असतानाही हरियाणातील भाजप सरकार सुरक्षित आहे. नायब सैनी यांनी याच वर्षी १२ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर विधानसभेत फ्लोअर टेस्ट झाली. सैनी सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध केले होते. दोन फ्लोर टेस्टमध्ये किमान सहा महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा स्थितीत विरोधी पक्ष सप्टेंबर 2024 पर्यंत अविश्वास प्रस्ताव आणू शकत नाही. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हरियाणात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अल्पमतात असल्याने सुद्धा सरकार सुरक्षित आहे. त्यामुळे सैनी सरकार पडणार नाही. देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचं वातावरण असताना हरियाणात मात्र भाजप सरकार धोक्यात आलं आहे. नायब सिंग सैनी यांच्या सरकारला संकटाचा सामना करावा लागत आहे.

 

Protected Content