Home क्राईम एकाच कुटुंबातील तीन जणांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू

एकाच कुटुंबातील तीन जणांचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू

0
56


कोल्हापुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापूर जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजरा तालुक्यातील गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 जणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ७ मे रोजी मंगळवारी सकाळी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुळे येथील उदय बचाराम कटाळे, अरुण बचाराम कटाळे हे दोन्ही भाऊ धुणे धुण्यासासाठी हिरण्यकेशी नदीच्या बंधाऱ्यावर गेले होते. यावेळी अरुण यांचा मुलगा जयप्रकाश बंधार्‍यामध्ये धुणे धुत असताना अचानक बुडू लागला. हे पाहून अरुण यांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यानंतर हे दोघेही बुडू लागले. या दोघांना वाचवण्यासाठी उदय व अन्य एकाने उडी मारली. पण दुर्दैवीने अरुण, जयप्रकाश व उदय या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound