Home Cities यावल रावेरमध्ये रक्षाताई खडसे यांचा विजय होईल; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश...

रावेरमध्ये रक्षाताई खडसे यांचा विजय होईल; राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांना विश्वास


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला वेग आला आहे. महायुतीच्या रावेर लोकसभाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांना निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सरकार स्थापन करण्यासाठी व पंतप्रधान नरेन्द्र मोदीना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या रावेर लोकसभेच्या मतदारसंघातील उमेदवार रक्षाखडसे या तिसऱ्यांदा मोठया मताधिकाने विजयी होणार असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी व्यक्त केला.

उमेश नेमाडे हे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत आपल्या पक्षाचा निवडणुक प्रचार संदर्भातील आढावा घेण्यासाठी ते यावल येथील महायुतीच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली असता लाईव्ह ट्रेंड न्युजशी बोलतांना त्यांनी याप्रसंगी महायुतीच्या घटक पक्षाचे भाजप तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे यावल तालुका अध्यक्ष रितेष पाटील, भाजपचे विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, पुरूजीत चौधरी यांच्यासह आदी प्रमुख पदघिकारी यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound