नाहाटा महाविद्यालयाजवळ तरूणीचा विनयभंग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे राहणारी तरूणीचा भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळ तरूणीसमोर गाणे म्हणून हात पकडत विनयभंग केल्याची घटना सोमवारी ६ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे १९ वर्षीय महाविद्यालयीन तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी ६ मे रोजी तरूणी ही नाहाटा महाविद्यालयात असतांना त्याठिकाणी इलीयास शेख नरूद्दीन वय २५ रा. भुसावळ याने तरूणीकडे पाहून चित्रपटाचे गाणे म्हणू लागला.त्यानंतर तरूणीचा हात पकडून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर तरूणीने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी इलीयास शेख नरूद्दीन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोपान पाटील हे करीत आहे.

Protected Content