नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ६ मे रोजी आज उमेदवार माघारीचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर आज दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची संख्या निश्चित झाली आहे. नाशिकमध्ये एकूण ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ३६ उमेदवार पात्र ठरले होते. मात्र पाच जणांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील १५ उमेदवारांचा अर्ज निवडणूकीसाठी पात्र ठरला होता. मात्र पाच जणांनी अखेर निवडणूकीतून माघार घेत आपला अर्ज मागे घेतला असता आता दिंडोरीत एकूण १० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे.