धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील विवरे गावातील २५ वर्षीय तरूण हा धरणगाव शहरातून २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवार ३ मे रोजी सकाळी १०.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गणेश झंडू भालेराव वय २५ रा. विवरे ता. धरणगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील विवरे गावात गणेश भालेराव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गणेश हा त्यांची पत्नी वैशाली भालेराव यांच्या सोबत धरणगाव शहरातील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी आलेला होता. त्यावेळी बाजार करून मला धरणगावात काम आहे असे सांगून पत्नीला रिक्षा बसवून विवरे येथे पाठवून दिले. त्यानंतर गणेश हा सायंकाळ पर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांची पत्नी वैशाली भालेराव यांनी शुक्रवारी ३ मे रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.