पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांचा प्रचारार्थ जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांनी एरंडोल पारोळा मतदार संघात प्रचारासाठी वेग आलेला आहे व शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एरंडोल पारोळा मतदारसंघ सर्व पिंजून काढत आहे. कार्यकर्त्यांच्या फौजाफाटा घेऊन घरोघरी जाऊन मोदींविषयी माहिती आणि स्मिता ताईंना मत म्हणजे मोदीला मत विकासाला मत असे अमोलदादा पाटील नागरिकांना आवाहन करत आहात.
१३ तारखेला जास्त जास्त मतदान करण्यासाठी गावागावात आवाहन करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पळासदल जळू, नाडखुर्दे बू।, नादखुर्दे खू।, हनुमंतखेडा, सोनबर्डी, फरकांडे, मालखेडे, उमरे आडगाव व आडगाव तांडा, या गावांना भेटी देत स्मिता वाघ यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्यासाठी आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, जि.प.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम तात्या राक्षे, तालुका प्रमुख रवि जाधव युवा सेना तालुका प्रमुख बबलू नगरसेवक, कृणालभाऊ महाजन, युवा सेना तालुका प्रमुख कमलेश पाटील, पंकज मराठे यांच्यासह स्थानिक गावांचे आजी-माजी सरपंच उपसरपंच सदस्य विकासो आजी-माजी चेअरमन व्हा. चेअरमन संचालक शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.