Home क्राईम तरूणाचा महागडा मोबाईलची चोरी

तरूणाचा महागडा मोबाईलची चोरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या तरूणाचा १५ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी २ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, यश नंदकिशोर मोरे वय २२ रा. स्वप्निल अपार्टमेंट योगेश्वर नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घूसून १५ हजार रूपये‍ किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी मोबाईलचा सर्वत्र शोध घेतला परंतू मोबाईल संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी दीड वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound