चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील एका गावातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षी अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान ९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ती जेवण करून कुटुंबासह झोपली होती. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. ही बाबत १० एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजता उघउकीला आले. तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार हे करीत आहे.