Home क्राईम सुगंधित पान मसाला व गुटख्याच्या ट्रक पकडला

सुगंधित पान मसाला व गुटख्याच्या ट्रक पकडला


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे फाटा जवळ गुरुवार ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणारा वाहन ट्रक मेहुनबारे पोलिसांनी पकडला आहे. यात एकूण १८ लाख ३९ हजार ८४० रुपये किमतीचा संबंधित पान मसाला गुटखा आणि ट्रक जप्त केला आहे. याप्रकरणी शुक्रवार १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे फाटा रस्त्यावरून ट्रकमधून बेकायदेशीररित्या गुटखा व सुगंधित पान मसाला याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मेहुनबारे पोलिसांना मिळाली. त्यानुसार मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी पथकाला कारवाई करण्याचे सूचना दिल्या. त्यानुसार गुरुवार ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता पथकाने मेहुनबारे फाट्याजवळ कारवाई केली. यात ट्रक क्रमांक एमएच 20 जीसी 5573 हा पकडला. त्यानंतर ट्रक मध्ये पाहणी केली असता त्यात गुटखा व सुगंधित पान मसाला आढळून आला.

पोलिसांनी हे ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपी अशोक मंडोरे रा.अहमदनगर, विवेक बन्सीधर कुलकर्णी रा. छत्रपती संभाजीनगर, शंकर गरुड रा. छत्रपती संभाजीनगर, संजय माता रा.मध्यप्रदेश आणि दीपक वालीच्या रा. मध्यप्रदेश या पाच जणांविरोधात शुक्रवार १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोडे हे करीत आहे.

 


Protected Content

Play sound