पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथे सालाबादप्रमाणे यंदाही सिंधी समाजाचे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांच्या वार्षिक महोत्सव दि १३ एप्रिल ते दि १५ एप्रिल पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराच्या वतीने देण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरातील ओत्तर गल्लीतील बाबा ज्युडियाराम सिंधी समाज मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही बाबा ज्युडियाराम साहेब यांच्या वार्षिक महोत्सव तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती मंदिराचे महंत बाबा ज्युडियाराम साहेब यांचे नातु सांई हिरानंदजी सिंधर यांनी दिली आहे.
याप्रसंगी मंदिरात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात दि १३ रोजी सकाळी बाबा ज्युडियाराम साहेब यांच्या प्रतिमेला पंचामृत अभिषेक करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात येईल त्यानंतर सकाळी ११ वाजता अखंड पाठसाहेब पठणाला सुरूवात होईल हा पाठसाहेब म्हणजे गुरु ग्रंथ साहेब हे एक वेळ वाचना ला सुरुवात झाली म्हणजे ते पुर्ण होई पर्यंत न थांबता वाचावे लागते याला पुर्ण वाचनाला तिन दिवस व दोन रात्री अखंड लागतात तरच त्याचे वाचन पुर्ण होते.
सांयकाळी बाबा ज्युडियाराम साहेब यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटीकेचे सादरीकरण रात्री जळगाव येथील प्रसिद्ध बाबा गुरूदासराम बालक मंडळ यात प्रसिद्ध गायक मनोहरलाल, कन्हैयालाल यांचा सुमधुर भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच दि १४ रोजी सकाळी मंदिरावर ध्वजारोहण (झेंडा सलामी) दुपारी महिला भगिनींनी साठी एक शाम बाबा के नाम प्रतियोगिता चे आयोजन करण्यात आले आहे रात्री नंदुरबार येथील प्रसिद्ध बाबा गरिबदास मंदिरातील बाबा गुरूदासराम साहेब समाधीवाले यांच्या पादुका व त्यांनी आपल्या जीवनात वापर केलेल्या वस्तू यालाच बाबांची स्वारी असे संबोधले जाते या बाबांची स्वारी चे अनोखे दर्शन भाविकांना होणार आहे. याप्रसंगी नंदुरबार येथील प्रसिद्ध गायकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि १५ रोजी सकाळी बाबा ज्युडियाराम साहेब व बाबा ज्युडियाराम साहेब यांचे परमभक्त बाबा गोरधनदास यांच्या प्रतिमेचे पंचामृत अभिषेक होणार असल्याची माहिती मंदिराच्या वतीने देण्यात आली आहे तसेच दुपारी मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंडपाठ साहेब ला भोग साहेब त्यानंतर पल्लव साहेब ने कार्यक्रमांची समाप्ती होणार आहे याप्रसंगी राजकोट गुजरात, इंदौर मध्यप्रदेश, जळगाव, धुळे, नंदुरबार, दोंडाईचा, यांच्या सह इतर अनेक शहरातील भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली तरी या तिन्ही दिवस भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन बाबा ज्युडियाराम मंदिराचे महंत बाबा ज्युडियाराम साहेब यांचे नातु सांई हिरानंदजी सिंधर यांनी केले आहे.