Home क्राईम धक्कादायक : शिवीगाळ व मारहाण करत महिलेवर अत्याचार; दोन जणांना अटक

धक्कादायक : शिवीगाळ व मारहाण करत महिलेवर अत्याचार; दोन जणांना अटक


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेला धमकी व मारहाण करून वेळीवेळी अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात ३७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्या एका खासगी प्रशिक्षण केंद्रात नोकरीला आहे. दरम्यान, १४ जानेवारी २०२३ ते ९ जानेवारी २०२४ दरम्यान संशयित आरोपी रविंद्र गोलांडे रा. चोरवड ता. भुसावळ याने महिला एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिचा अश्लिल शिवीगाळ व मारहाण करत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारासाठी रविंद्र गोलांडे याचा मित्र लक्ष्मण कोळी रा. दिपनगर, भुसावळ याने रिक्षा उपलब्ध करून मदत केली आहे. हा अत्याचार सहन न झाल्याने महिलेने अखेर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रविंद्र गोलांडे आणि त्याचा साथीदार लक्ष्मण कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू सांगळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound