Home क्राईम दुचाकीवर बसवून तरूणीचा विनयभंग

दुचाकीवर बसवून तरूणीचा विनयभंग

0
111

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रिणीला भेटवून देतो असे सांगून १९ वर्षीय तरूणीला गिरणा टाकी परिसरातून दुचाकीवर बसवून नेत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवार १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १९ वर्षीय तरूणी ही शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. दरम्यान जयेश अरूण सोनार रा. पारोळा याने पिडीत तरूणीला मैत्रीणीला भेटवून देतो असे सांगून सोमवारी १ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता जळगावातील गिरणा टाकी परिसरातून दुचाकीवर बसवून नेत तिच्या सोबत अश्लिल चाळे करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता तरूणीने थेट रामानंद नगर पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी जयेश अरूण सोनार रा. पारोळा याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहे.


Protected Content

Play sound