Home क्राईम एमआयडीसीतून ट्रॅक्टरची चोरी; गुन्हा दाखल !

एमआयडीसीतून ट्रॅक्टरची चोरी; गुन्हा दाखल !

0
123


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत मधील डी सेक्टर मधून ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे नवीन ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात चौकशी अंती अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव औद्योगिक वसाहतीच्या डी-सेक्टरमध्ये मोहन तोताराम चौधरी (वय-५८ रा. जळगाव) यांच्या मालकीचे नवीन ट्रॅक्टर लावले होते. २ डिसेंबर २०२३ रोजी ६ लाख ८५ हजार रुपये किमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. ट्रॅक्टर चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहन चौधरी यांनी सर्वत्र चौकशी केली, दरम्यान या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर चौकशी अंती मोहन चौधरी यांनी मंगळवार २ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound