चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील हिंगोणे खुर्द गावातील शांकभरी देवी मंदिरातील दानपेटी फोडून २ हजारांची रोकड लांबवल्याची घटना बुधवार २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. या संदर्भात शनिवार २३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगोली खुर्द गावात शांकभारी देवी मंदिर आहे. बुधवारी २० मार्च रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील गाभाऱ्यात असलेली दानपेटीचे कुलूप तोडून त्यातून २ हजार रुपयांची रोकडची चोरी केल्याची घटना उघडकीला आली. याबाबत दिलीप दौलतराव चव्हाण यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार शनिवारी २३ मार्च रोजी दुपारी अडीच वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन सोनवणे हे करीत आहे.