Home क्राईम ला.ना. विद्यालयात चोरीचा प्रयत्न अयशस्वी

ला.ना. विद्यालयात चोरीचा प्रयत्न अयशस्वी

burglar cartoon clipartpanda
burglar cartoon clipartpanda

burglar cartoon clipartpanda

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयात लाकडाचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान चोरांच्या हाती कुठलाही ऐवज लागला नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 

ला.ना. शाळेच्या मागील बाजूस विद्या निकेतनच्या बाजूने शिक्षिकांसाठी विश्रांती कक्ष आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री या कक्षाच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर येथील लाकडी कपाट फोडले व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. मात्र त्यांच्या हाती काहिही न लागल्याने चोरटे माघारी परतले. आज (दि.२४) सकाळी शाळेचे सुरक्षारक्षक शाळेत आला. त्याने पुढील बाजूने कुलूप बंद असलेला शिक्षिका कक्ष उघडला तेव्हा त्यांना सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

सुरक्षारक्षकाने घटनेबाबत संस्थेचे पदाधिकारी, शाळा प्रमुखांसह, विभागप्रमुखांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुरक्षारक्षक तसेच विभागप्रमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती, मुख्याध्यापक दुर्गादास मोरे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound