जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त प्रतिबिंब२०२४ क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. तर रांगोळी, मेहंदी स्पर्धा आणि आनंद मेळा कार्यक्रमही झाला.
महाविद्यालयाच्या मैदानावर बॅडमिंटन, क्रिकेट, संगीत खुर्ची, गोळा फेक, थाळी फेक, पन्नास मीटर धावणे, लिंबू चमचा आदी स्पर्धा घेण्यात आल्या. याप्रसंगी आनंद मेळा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. स्वाती चव्हाण यांनी केले. महाविद्यालयातील डीएलइएड, बीपीएड, बीएड विभागातील महिला आणि पुरुष स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक राणे होते. क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. नीलेश जोशी यांनी डॉ. देवानंद सोनार यांचे शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार केला. प्रा. डॉ. पंकज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वार्षिक क्रीडा स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा. शालिनी तायडे, प्रा.आकाश बिवाल, डॉ. गणेश पाटील, प्रा. किसन पावरा, शैलेश कुलकर्णी, भरत चौधरी यांचे सहकार्य लाभले.