Home Cities पारोळा पारोळ्यातल्या राजीव गांधी नगरातल्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश

पारोळ्यातल्या राजीव गांधी नगरातल्या युवकांचा शिवसेनेत प्रवेश


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शहरातील राजीव गांधी नगर भागातील तरूणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी या युवकांचे अमोल पाटील यांनी शिवसेनेत स्वागत केले. याप्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील, सुर्यवंशी बारी समाजाचे उपाध्यक्ष गणेश बारी, उपशहरप्रमुख नितीन बारी, पंकज मराठे, बापु मराठे, मन्साराम चौधरी, कृष्णा मराठे, गोरख चौधरी, राजेंद्र पाटील अजय पाटील, प्रविण पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ज्ञानेश्वर कोळी, कैलास चौधरी (शुटर), पवन कोळी, रोहीत कोळी, अजय कोळी, समाधान भाऊ, गोविंदाआप्पा, धनराज पाटील, रामचंद्र पाटील, भुरा कोळी, करण भाऊ, जितु कोळी, लक्ष्मण पाटील, सागर पाटील, आनंद कोळी आदींनी प्रवेश घेतला. या सर्वांचे अमोलदादा पाटील यांनी स्वागत केले.


Protected Content

Play sound