भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कुऱ्हा गावात कोंबड्यांची झुंज लावून सत्ता खेळवणाऱ्या ११ जणांवर पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की भुसावळ तालुक्यातील कऱ्हा गावात एका शेतात कोंबड्यांची झुंज लावून सट्टा खेळावीत असल्याची माहिती भुसावळ येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या .पथकाने शुक्रवार ८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता कुऱ्हा गावातील रईस बागवान यांच्या लिंबूच्या शेतात छापा टाकला. यावेळी झुडपात १५ ते २० व्यक्ती कोंबड्यांच्या झुंजी लावून सट्टा खेळतांना दिसून आले. दरम्यान पोलिसांनी छापा टाकताच काहीजण पसार झाले. यावेळी ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलीसांनी फायटर कोंबडे, मोटरसायकली, मोबाईल असा एकूण ५ लाख ८६ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख सईद शेख सादिक वय-२३, शेख जावेद शेख हाफिज वय 38, आशिष राजेश सोनी वय-21, नेल्सन लेनिन पेट्रोल वय-31, मोहसीन शेख वय-32, शेख सलमान वय-२३, अर्जुन बादल गरड वय-२४ , शेख इमाम शेख याकूब वय-३८ असे ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.