पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील व शहरातील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासन, कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कामगार नोंदणी केलेल्या कामगारांना संसारोपयोगी साहीत्यासाठी भडगाव येथे बांधकाम कामगारांना १५ ते २० दिवसापासून येलपाट्या माराव लागत होत्या. त्या अनुषंगाने तालुक्यातील व शहरातील बांधकाम कामगारांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे व अमोल पाटील यांच्याकडे भडगाव येथे होत असलेल्या गर्दीमुळे चार पाच दिवसापासून फेऱ्या माराव लागत होत्या म्हणून आमदार चिमणराव पाटील यांना सांगितले की आम्हाला पारोळ्यामध्येच भांडे मिळायला पाहिजे.
भडगाव मध्ये चार ते पाच तालुक्यातील नागरिक येत असल्याने आम्हाला भांडे मिळाकले नाही आहेत आणि आमची रोजंदारी पण गेली आहे चार पाच दिवसाची आबासाहेब आमदार चिमणराव पाटील यांनी तात्काळ नाशिकचे आयुक्तांकडे मागणी केली की आमच्या पारोळा तालुक्याच्या बांधकाम कामगारांना भांडे वाटण्याचे सेंटर देण्याबाबत मागणी केली. तात्काळ नाशिकचे आयुक्तांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे सेंटरसाठी जागा करण्यासाठी विनंती केली आमदार पाटील यांनी कजगाव रोडवरील खाजगी आयटीआय मध्ये तात्काळ जागा करून दिली व दोन तारखेपासून बांधकाम कामगारांचे भांडे वाटपाची पाच दिवस नोंदणी करण्यात आली व आज सकाळपासून भांडी वाटणी करायला सुरुवात केली. यावेळी आमदार चिमणराव पाटील व जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे शहरप्रमुख अमृत चौधरी, व तालुकाप्रमुख बबलु पाटील, पळासखेडे येथील सुभाष पाटील, लोणीसिम सरपंच डॉ. कैलास पाटील, मन्साराम चौधरी, पंकज मराठे, गिरड मा.सरपंच संजयआबा पाटील, पारोळा येथील भिका महाजन भावडू चौधरी सलीम पटवे यांचेसह कामगार बांधव व भगिणी उपस्थित होते.
